शनिवार...!
शनिवार...!
1 min
25K
श निवार अर्धाच असा पक्का
नि वांत पणाचा भाव मनात जागवतो
वा टत दुधावरची तहान ताकावर
र डत कडत का असेना भागवतो
नकरत्याचा वार म्हणून
जरा उसंत तरी मिळवून देतो
रविवार पदरात टाकून
कोणतही काम सोमवारवर ढकलून टाकतो
हा वार मला फार आवडतो
रविवार माझ्या साठी
विनातक्रार बिनभोबाट
माझ्या पदरात टाकतो
कोणी काहीच मला देत नाही
ना पैसा अडका
ना मान मरातब
ना सुख समाधान शांती
पण
हा मात्र सुखाचआंदण
न चुकता मला देतो...!
