सहजीवन
सहजीवन
1 min
284
उंबरठ्यावरी भार्या
हात हातात गुंफुनी
माप सोन ओलांडूनी
भाग्यलक्ष्मी ये जीवनी
सुख दुःखात दिलीस
मज आनंदाने साथ
कधी नाही भांडलीस
नाही घातलास वाद
मन निर्मळ गे सखे
सुखदुःख गोड माने
डोळ्यातील अश्रू त्वरे
मागे नेशी शिताफीने
माझा फाटका प्रपंच
शिवलीस तू रजई
दुःख आतच सारुनी
सजविली अस्तरानी
वर्षे गेली भराभरा
दंग मी सहजीवनी
आली ही कांचनसंध्या
स्वागतास आनंदानी
सुखी मी कृतार्थ मी
बहरले सौख्य मनी
साथ दे मज वल्लभे
मजलागी जन्मोजन्मी
