शिक्षक राष्ट्राचा आधारस्तंभ
शिक्षक राष्ट्राचा आधारस्तंभ


शिक्षकाचा असतो
सकारात्मक दृष्टीकोन
देतो सतत
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
शिक्षक असे
राष्ट्राचा आधारस्तंभ
औपचारिक शिक्षणाचा
करी आरंभ
प्रेमळ, समजूतदार
गुण किती
बदलत नाही
कधी नीती
खडू, फळा
खरे मित्र
साक्षरतेचा वाटत
फिरी मंत्र
कामासाठी आपुल्या
सदैव तत्पर
नसे अपेक्षा
होईल सत्कार
विद्यार्थ्यांची जडणघडण
हीच सेवा
लुटतो मुलांवर
ज्ञानाचा ठेवा
नवनवीन कौशल्यांचे
करी स्वागत
परिपूर्ण होण्यासाठी
घेई मेहनत
अद्ययावत राहण्याकडे
असतो कल
काळानुरूप घडवी
स्वतःत बदल
घेऊनी हाती
नवनवीन उपक्रम
कामावर आपुल्या
बसवी जम