शीर्षक: दिपोत्सव....
शीर्षक: दिपोत्सव....
1 min
287
दिप पेटले अंगणात पणती
जळती तुळशी समोर
आकाशी दिवा झोका घेतो
अमुच्या दाराच्या समोर....
दिवा हा दिवाळीचा पेटविला
ओवाळते भाऊराया तुला
भाऊबीज सण आनंदाचा
ताई ओवाळणी सुख लाभो तुला....
बलिप्रतिपदा सांगे महत्ती
सैरू आणि भैरूची कथा
जना सुख लाभो सदा सर्वदा
हेच मागणे लक्ष्मी माता....
नरकासुराचे वंध झाले
गोविंद हो मुखी बोला
कायटान फोडता विसरा दु:ख
दिवाळी सण घरोघरी आला....