आठवण तुझी मित्रा
आठवण तुझी मित्रा
1 min
172
फळ्यावर दररोज सुवाच्च्य
अक्षरात सुविचार लिहिणारा
सुरज....
दररोज माणसाची कागदावर
सुंदर चित्र काढणारा
सुरज....
व्यवस्थित पूजास्थान सजविणारा
लक्षवेधी कलावंत अपुला
सुरज....
मी हास्याचे विनोद करताना
सूत्रसंचालन करणारा
सुरज....
नकळत आठवणीत शब्द
तुझ्याबद्दल लिहिताना सुरज
डोळयात अश्रू आले
मित्र-भावा तुला नमन...
