पाऊस
पाऊस
1 min
266
मी अनुभवलेला पाऊस
तो ढगातून रिमझिम पडायचा
ओलीचिंब होत होती काळी माती ....!
व्हाळुलीतून पाणी नदीच्या
भेटीस जात होत तेव्हा
मासे ही पोहण्याची मज्जा घेत होती....
बियाणे गाढलेले अंकुरले
क्षणात पावसाळ्यात असे
हिरवळ झाली भूय ती....
झरा तो पाण्याचा थंडगार होता
बेडूक इशारा पावसाला करत होता
अनुभवलेला पाऊस गावात पडत होता...