शेवटी जगात...
शेवटी जगात...


माझ्याच पोटच्या लेकराने मला मरणाच छळलं होत,
शेवटी जगात कुणीच कुणाचं नसत हे मला कळलं होत.||धृ||
जन्म दिला, पालन केले..
त्याला शिकवण्यासाठी काबाडकष्ट केले..
त्याला शिकवण्यासाठी माझ्या बायकोने दुसऱ्याच दळणंही दळल होत.१
शेवटी जगात..
मला म्हणाला बाबा मी चार पैसे कमविण,
माझ्या हिरव्या नोटांनी तुमची सारी दुःख दूर करीन,
याच बोलण्याने माझं मन सुखाने भरलं होत.२
शेवटी जगात...
त्याने कमावलं सार काही,
मात्र जुन्या सामनांची त्याला अडगळ होई
हळू हळू एकेक समान घराबाहेर गेलं होतं..३
शेवटी जगात ..
माझपन त्याला ओझं झालं,
पोराने बापाला पोरकं केलं,
जिवंतपणीच मला मरणं बर वाटल होत...४
शेवटी जगात...