शेवटचें एकदाच.....!
शेवटचें एकदाच.....!


पुन्हा कधी,
भेट होइल का...?
बरेच देणे बाकी आहे मा
माझ्याकडें....!
ते फूल सुकलय आता
गंध पण हरवला आहे
जवळ येवून हट्ट करतें
तुझ्या कडे येण्याचा...!
तेव्हाच्या प्रेमस्मृतीहीं
धूसर झाल्यात
जाळं जळमट झालयं
अनुभवांचे....!
त्या आठवणी
त्या सोबतच्या घटका
त्या आणाभाका
तो स्पर्श, तो श्वास
मला सारे काही परत
करावयाचे आहे......!
आता श्वास साथ नाही देत गं
एकदा भेट होइल कां??
एकदाच......... !