STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

शब्दसखी

शब्दसखी

1 min
28.3K


उलटली ही चाळीशी

झाले जराशी निवांत

कसा घालवू वेळ मी

हीच असे एक भ्रांत


मुले गेली दूरदेशी

रिक्त झाले हे घरटे

पतिदेव व्यस्त सदा

वाटे मजला एकटे


व्याधी करिती हैराण

जाऊ देते न कोठे

बोलू कुणाशी मी कशी

पडे कोडे हेच मोठे


आली अवचित हाती

काव्यमय जलधारा

वाहू लागला शब्दांचा

झुळझुळ गोड झरा


शब्द झाले माझी सखी

बंध रेशमी जुळले

नवी शब्दसखी मीच

माझी मला गं भेटले


शब्द झुल्यावर सखे

घेऊ लागले हिंदोळे

मुक्त झाल्या भावना

झाले मनही मोकळे


अष्टाक्षरी नि हायकू

काव्यांजली नि अभंग

कथा, कादंबरी, लेख

शब्दांचेच किती रंग


रंगुनिया शब्दरंगी

रंग न्याराच लाभला

झरू लागली लेखणी

घेऊनिया नाना कला.


शब्दांनीच दिल्या मज

नव्या नव्या ओळखी

'साद' नावाची मी अशी

झाले बरं शब्दसखी.


Rate this content
Log in