शब्दांच्या पलीकडले
शब्दांच्या पलीकडले
1 min
544
ओळख पहिली लाज बावरी
तिचे मन खुलविते
प्रियतमास नयनी पुसते
सांग कशी दिसते?
अंतर्मुख तो प्रियकर
मनी भाव दाटती
जन्मजन्मांतरीची सखी
परमप्रिये तू रुपवती
होशील का तू माझी?
नयनास भिडे नयन
सखीच्या नेत्रपल्लवीने
अनुरागाचे वचन
प्रीत प्रीतीशी धागा जुळतो
रेशमी अनुबंधन
रेशीमगाठी गोड गुंफिती
विवाहवेदीचे वचन
पहिल्या रात्री स्पर्श बोलका
शब्द होती आजाण
जन्मजन्मांतरीच्या ओढीने
मीलन परिपूर्ण
शब्दावीण कळते सारे
शब्दांच्या पलीकडले
अशीच का ही प्रीत अबोली
मनामनात उमलते
