*शाळा आमुची छान*
*शाळा आमुची छान*
आमची शाळा आमची शाळा
लाविते लळा जसा माऊली बाळा
शिकवते मुलांना अ आ इ ई
घडविते जशी मुलांना आई
आमची शाळा छान छान
भींतीवर चित्रे मोठी लहान
मीकी चालवतोय सायकल लहान
ससा पाहतोय कासव वळवून मान
मोर नाचतोय छानदार
पोपटाची चोच बाकदार
झाडाच्या अाकृतीत लिहिलेत मूल्यसंस्कार
परीपाठाला मुले हजर राहतात
वर्गात जावून शांत बसतात
अध्ययनास तयार होतात
बाई वर्गात येतात
मुले शांत ,शिस्तीत बसतात
नवनर्मितीत,सृजनतेत रमतात
आनंदानने अभ्यास करतात
नैपुण्य त्यांचै अनेक क्षेत्रात
बक्षीसे मिळतात विविध स्पर्धात
मुख्याध्यापक,संस्थापक विचार करिती मुलांचा,शिक्षकांचा,शाळेचा
अन समाजाचा
शिक्षक विचार करिती बालकांचा
आमच्या शाळेत सर्वच हुशार
आहेत सर्व कर्तबगार
अशी आमची शाळा सुंदर
पुण्यात आहे पहिला नंबर.....
