सहा जून(6)
सहा जून(6)


सहा जून(6)
पाचवा लॉकडाऊन
सहावा दिवस आनंदाचा....!
स रलं चंद्रग्रहण
हा ही अडथळा पार पडला
वा टलं ही अडथळ्यांची मालिका
दि वसा नव्हती ते एक बरं झालं....
व रकरणी फुशारकी मारली तरी
स मजून उमजून घाबरतो आपण
आ गंतुक संकटांना मात्र
नं बर लावून सामोरे जातो आपण....
दा वा करतो जाता जाता
चा वटपणा मनात लपवून
समाचार अंती घेतोच आपण
मोठ्या धीराने कंबर कसून..
उगवता दिवस हेच सांगतो
अजूनही घरीच राहा बाबा
खरे सांगायचे झाले तर
अजूनही मात केल्याचा
मिळाला नाही ताबा....!
सुप्रभात...!