सद्विचारी तुळस!
सद्विचारी तुळस!
वाचकांच्या तुळशी वृंदावनात
भांगेच बी रुजलं
आणि जोमाने ते
चांगलच फोपावलं
काँग्रेस गवताची जात ही
चौफेर जोमाने पसरली
पहाता पहाता तुळस
अंगणीची धोक्यात आली
डबक्यातल जीणं आता
साऱ्यांनाच गोड वाटू लागलं
आम्ही दोन आमचे दोनच
गणित डबक्यात फिरू लागलं
हार तुरे कौतुकाचे
आळीपाळीने गळे बदलू लागले
सर्वांचेच डबक्यात मनसुबे
पुरे होऊ लागले
प्रतिस्पर्ध्याची भीती आता
उरी मूळ धरू लागली
कुसळाची बोचणीही
डोळ्यात खूपु लागली
हा नको तो नको ची
उर्मी उफाळू लागताL
तुळशीच्या जाण्याची
घटीका भरून आली
ती बिचारी निर्मळ
सद्विचारांची तुळस लाजून चुर झाली
भांगेला रान मोकळे सोडून
दूर देशी आनंदे निघून गेली....!
