सचिन तेडूलकर
सचिन तेडूलकर
निरोप घेशीलआता सचिन
क्रिकेटचा अन् असंख्य विक्रमांचा
मैैदान सोडशील जड पावलांनी
ठोका चुकेल कोटी कोटी हृदयांचा.
एक एक पावलागणिक
कारकिर्द तुझी आठवणार
केविलवाणा चेहरा तुझा
पुन्हा एकदा रडविणार.
अवघ्या विश्वाचे लक्ष आता
तुझ्या वर लागलेेलेे असणार आहे.
लयबद्ध खेळी तुझी परत
आता कधीच नाही दिसणार.
तुझ्याविना क्रिकेट पोरकं होईल
पण सूर्यच आहेस तू आमचा
नित्य तुझ्या दैैदिप्यमान तेजाने
भारतवर्ष सदैव उजळून जाईल.
कीर्तीच्या उत्तुंग शिखरावर
श्रीमंत केलेस भारतभूमिला
सलाम तुझ्या माता -पित्याला
सलाम तुझ्या कारकिर्दीला.
