सौंदर्य मनीचे
सौंदर्य मनीचे
मन पाखरू उंच
अभाळी चा गेरू
मन अधिर श्रावण
बरसे होऊनी मेघ
मन चिंब पावसाळी सर
भिजते मनीच्या पावसात
मन दर्पण तीचे जणू ..
सुन्दर रचना भासे विश्व ती
मन निर्मळ तीचे जणू
पावसाच्या सरी थेंब
कोलाहलत ही असते
एक मन कळी होऊन बहरते
मनीचे सौंदर्य पाहुनी ..
चित्र नभीचे हासते
चल बिचल अचल
नसेल ही मन का बिथरते ...
असे तिचा हुंदकाही सुरेल
मन असुसते त्या सौदर्यसाठी
घेते मन भरारी नभीच्या अंगणी
मन कधी चंद्र कधी रोहिणी..
रचनां घालती भुरळ अशी
मन वाटे मोरपीसि काव्य ही
किती आणि काय दाटे मनी
तिची कथा भासे जणू चांदवा चंदनी
भ्रमरची कला असे अवगत तिला ही
कालीका असे अजुनी कोमल कांती
लागते झुरणीस पाहुनी सर ती ..
असे त्याहुनी सुन्दर सौंदर्य मनीचे ही