सौभाग्य माझे
सौभाग्य माझे
1 min
689
अंकुर कोवळा
वाढे माझ्या उदरात
चाहूल पदरात
मातृत्वाची
सोसल्या किती
प्रसव वेदना असह्य
झाले सुसहय
जीवन
सौभाग्य माझे
झाले आज आई
किती बाई
आनंदले
बहाल केले
मजला तू मातृत्व
आले पूर्णत्व
स्त्रीत्वास
'आई' म्हणुनी
घालिशी अशी साद
मंजुळ नाद
घुमतसे.
