सैनिक
सैनिक
1 min
508
सैनिक..
माझ्या वीर सैनिकांचे
फेडू कसे उपकार
आकाशही खुजेच पडते
ठेंगणे सगळे सार ..
फुलेही कोतिच भासते
आखूड मोत्यांचे हार
अवीट सुगंध तया स्मृतींना
चंदन होई उतार ..
समुद्रतोही गर्वाने मातसे
होऊन येई जलधार
पुजितांना पाय धूळीला
अश्रूंचे वाहतो हार ..
पोवाडा गातांना तयांचा
शब्दही लागे अफार
सूरही भारावून जाते
हदयाशी जुळता तार ..
स्फूर्ति संचरते अंगात सगळ्या
रक्त सळसळते अपार
देशभक्तीने न्हाऊन निघते
कानी कोपरा पार
निर्धास्त वाहते श्वास आमुचे
निवांत झोपतो परिवार
तुम्हांमुळे घास मुखी अन्
जीवन हे उपहार ..
