सावली
सावली
1 min
41.5K
सोडून गेले सर्वजण..
पण ती मात्र सोबत राहिली...
सूर्य डोक्यावर येता पायात ती माझ्या घुटमळते...
मावळतीला सूर्य जाताच बाजूला ती उभी रहाते....
सूर्य नाहीसा होताच ती ही दिसेनाशी होते.....
पण लाईटचा उजेड माझ्यावर पडताच पुन्हा ती अवतरते...
आणि मलाच घाबरावते...
हसते ती कधी माझ्याकडे बघुनी...
मलाही हसवते माझ्यासारखे वागुनी....
नाही राहु शकत मी तीच्या वाचून कारण ती आहे माझीच प्रतीकृती... .
