सावली
सावली
1 min
27.9K
हरविली ती मायेची
झाडांची थंडगार सावली
माणसांच्या हव्यासापोटी
सारी झाडे तोडली
आंब्याच्या झाडाखाली खेळ
मुलांचा खुप रंगायचा
ऊन्हात काम करुन थकलेला
माणुस सावलीत येऊन बसायचा
आता फिरतो वणवण
झाडांच्या सावलीसाठी
उरली नाही कोणतीच झाडे
थोड्याशा विश्रांतीसाठी
झाडांच्या बेसुमार तोडीमुळे
तापमान खुप वाढले
सावलीतून मिळणाऱ्या शांततेला
सारेच आता मोकु लागले
