Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dinesh Kamble

Others

4  

Dinesh Kamble

Others

सावळी मूर्ती

सावळी मूर्ती

1 min
342

सावळ्या रंगाचा । माझा तों श्रीहरी । 

वाजवी बासरी । माळावरी ॥ १॥

तेज मुखावर । सुर्याची ग आभा । 

माझ्यासाठी उभा । वाटेवरी ॥ २॥

जाईन ग बाई । मी लगबगीने । 

त्याला अदबीने । भेटायला ॥ ३॥

रोखूनिया डोळे । त्याच्या मूर्तीवर । 

त्याची मी नजर । काढेल ग ॥ ४॥

घेईन भरून । डोळ्यात ते रूप । 

विश्वाचे स्वरूप । ज्याचेपायी ॥ ५॥

जोडूनिया कर । विनवणी देवा । 

आशीर्वाद द्यावा । पामराला ॥ ६॥

Rate this content
Log in