सावित्री
सावित्री
1 min
27.4K
सावित्री सत्यवानाची
किमया हो निसर्गाची
महती सांगे वडाची
निरोगी हो आरोग्याची
एक सावित्री फुल्यांची
महती यजमानांची
ओढ तिला शिक्षणाची
सुसंस्कारित मनाची
कथा आजच्या लेकींची
झेप घे अवकाशाची
चूल मूल नोकरीची
महती ही प्रगतीची
कथा आहे स्त्री जातीची
जपणूक संस्कारांची
धार हो तलवारीची
मायेची अभिमानाची
