सावधान
सावधान
1 min
27.9K
सावधान!
आपल्या सावल्या
पावलांखालून निसटू लागल्यात
दमलेल्या पायांना म्हणावं
आता चाल करून जा
मिट्ट अंधारातून आपल्या डोळ्यांत
अनाहूतपणे शिरू पाहणाऱ्या
निगरगट्ट उजेडाकडे
नाहीतर तुमच्या सभोवार
पाश आवळत जाणारी रात्र
तुम्हाला कधी पोटात घेईल
याचा काही नेम नाही
