STORYMIRROR

Ravindra Gaikwad

Others

4.3  

Ravindra Gaikwad

Others

साठवलय हृदयात

साठवलय हृदयात

1 min
324


मामा तुम्ही सोडून आम्हा गेलात

यावर बसत नाही विश्वास,

आमच्या अवतीभवती असल्याची

रोज होते जाणीव खास.


तुम्ही उमटवून गेलात

तुमच्या कर्तृत्वाचा ठसा,

आजही रडतोय परीवार

तुमच्या आठवणींत ढसाढसा.


किशन, बाबा आणि तुम्ही

एकामागे एक निघून गेलात,

डोंगराएवढं दुःख पेलायला

मजबूर आम्हा केलात.


होती मोठी स्वप्ने तुमची

जिद्द आणि विश्र्वास,

सर्वांच्या भल्याचा तुमच्या

मनी होता ध्यास.


स्पष्ट,परखड, अभ्यासपूर्ण

बोलनं तुमचं आठवतंय,

साक्षात दिसता डोळ्यासमोर

चरणी मस्तक हे झुकतय.


अर्ध्यावरतीच सोडून डाव

कळेना कसे गेलात..

छत्र हरवलं अचानक

पोरके साऱ्यांना केलात.


दाटून येतो कंठ

डोळ्यात येतं पाणी,

शब्द शब्द आठवतो तुमचा

येती लाख तुमच्या आठवणी.


रुप तुमचं डोळ्यात माझ्या

तुम्हा साठवलय हृदयात,

सोडून कसे गेलात मामा..

करून एवढा मोठा घात.


तुमच्या कार्याची जाण

तुमचे अनमोल ॠण.

ठेवून चरणी माथा

करतो विनम्र अभिवादन...


Rate this content
Log in