STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

साठी...!

साठी...!

1 min
8.3K


नकटीच्या लग्नाला

सतराशे साठ विघ्नपासून

साठी बुद्धीनाठी पर्यंत

साठ आकड्याचा आवाका

त्यात भरीसभर

साठ म्हंटल की

फर्स्ट क्लास

मग पेढे पार्टी

मौज मजा


कॉलर ताठ हे

योगान आलंच

गावात ईज्जत वाढायची

हुशार मुलगा म्हणून

कौतुक व्हायचं

एक वेगळंच वलय

अवती भोवती वावरायच


नजरा वेध घ्यायच्या

त्यात थोड

नीट नेटकं राहील की

वेगळीच लाईन मिळायची

त्यात पण स्पर्धा असायची

सगळ्याच हेवा करायच्या

वह्या लंपास व्हायच्या

वशिला लावला जायचा

वेगळं लेबल

कोणाकोणाला लागायचं


सॉफ्ट कॉर्नर तयार व्हायचा

हे सारं सहज सुलभ

राग रुसवा वैर भांडण तंटा

करत गुण्यागोविंदांन पार पडायचं

निरोप चिठ्ठ्या चपाट्या

शपथा आणाभाका व्हायच्या

हा कोपरा तो कोपरा

हे देऊळ ते देऊळ

कट्टा परड ओसरी मळा शेत

ओढा डमक हा पार तो पार

हे सारं गल्ली बोल पालथे

घालत घालत गाड्या वर्गात

लायब्ररीत प्रयोगशाळेत मैदानावर

मोठ्ठ्या खुबीने फिरायच्या


भरीसभर सहल नाटक

गॅदरिंग खेळांचे सामने पार पडायचे

शेवटी निरोप समारंभाला

खाणा खुणा व्हायच्या

एका मेकांचे हिरेरीने

हस्तांदोलन पार पडायचं


तो स्पर्श दरवळत रहायचा

तो शहारा अंगभर घुमायचा

चिडवाचिडवी शिगेला पोहचायची

शेवटी वाटा फुटायच्या

आणि मग ती साठ ची

खरी किंमत कळायची


जेव्हा वेळ येते

तेव्हा मात्र वाईट वाटते

साठी बुद्धी नाठी का हे कळते

मन मागोवा घेण्यास वळते

हातातली काठीही आता जळते

तरीही मन आठवणी मागे पळते

जेंव्हा शरीर साठी पार करते

आणि हेच सांगते

फर्स्ट क्लास फर्स्ट

सिक्सटी नॉट आउट

सिक्सटी नॉट आऊट....!


Rate this content
Log in