साथ दे तू मला
साथ दे तू मला


तुझ्या माझ्या प्रेमाची
बांधली स्वर्गात गाठ
अडचणी कितीही असो
तुटणार नाही ही साथ
आयुष्यात आपल्याला
आणखी काय हवे
चार रूम kitchen चा
Flat आपल्याला पुरे
घरा जवळ असो
सुंदरशी बाग
पक्ष्यांच्या किलबिलांनी
पहाटे येईल जाग
घरात आपल्या असावे
आई बाबांचे छत्र
त्यांच्या सुरेख संसाराचे
आत्मसात करू मंत्र
कॉफी आणि काव्याची
रोज करू मैफिल
Karaoke वर गाणी बोलून
घेऊ music चा feel
Weekend ला आपण
लॉंग drive ला जाऊ
धाब्यावर जेवणाचा
आस्वाद आपण घेऊ
तुझ्यासोबत जगण्यात
मज्जा आहे खरी
जोडी आपली पाहून
म्हणतात सर्व लय भारी