सात जून (7)
सात जून (7)


सात जून(7)
पाचवा लॉकडाऊन
सातवी सांज समंजस असावी...!
सा र सत्त्व जीवनातलं
त ळहातावरच्या फोडाप्रमाणं जपलं
वि चाराअंती वाटतं
सां गड बसण्याआधीच विरलं...
ज रा सूर गवसत होता
स गळं मुसळ केरात गेलं
मं तरलेल्या क्षणांनी
ज रा जास्तच घासलं...
स मंजसपणा जपला
आ ततायीपणा सोडला
सा रं सारं करून पाहिलं
वि टाळच खरा नडला...
आता सांजेला
पुन्हा श्री गणेशा करावा म्हणतोय
तेच ते ऊर्जेचे क्षण
पुन्हा वेचून घेतोय....!
शुभ सायंकाळ..!