STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

सारी उदाशी उदाशी

सारी उदाशी उदाशी

1 min
2.3K


बँकेमध्ये कर्जासाठी

केला होता एक अर्ज

बँक देईना म्हणून

घेतो सावकारी कर्ज ।।


होतं फुललं शिवार

त्याला नव्हता हो भाव

सारी उदाशी उदाशी

ओस पडला हो गाव ।।


बैल जोडी पोरं सोरं

सारी उपाशी तापाशी

लागे जीवाला रे ध्यास

कशी पिकवू कपाशी ।।


चक्र उलटे नशीबी

माझ्या मनाला खटके

डोळ्या समोर दिसते

फास गळ्याचा लटके ।।


निळ्या पांढऱ्या ढगात

नसे पावसाची आस

हाती घेऊन बसला

माझ्या गळ्याचा तो फास ।।


Rate this content
Log in