सांज काजळ होऊ दे..
सांज काजळ होऊ दे..
1 min
455
सखे येऊ नकोस तू ,भलत्यास वेळी
सांज काजळ होऊ दे, माझी झोपडी चंद्रमौळी
घे तू उसासा, थांबूनी जरासा
तु रूप मोहीनी, नाही बिल्लोराचा भरोसा
मुजोर चांदण्यांना, लाज नाही जराशी
पडदा आड ओढ,घे झाकुन उराशी
चालून ये जरा जरा,वारा मंद झाला
मोग-याचा सुगंध,आसमंतात उडाला
काढून घे पैंजण,येईन झणानी
रातही आहे,तझ्या रूपाची दिवानी
तू अलगद ये जवळी,मिठीत माझ्या
भाव हृदयाचा,हृदयाशी कळाला
मुग्ध झाल्या तारका,भरली शहाळी
सांज काजळ होऊ दे,माझी झोपळी चंद्रमौळी
