सांगायचं गेलं राहून.....!
सांगायचं गेलं राहून.....!
सांगायचं गेलं राहून
तुम्ही घरापासून जाताय डोकवून
मी सारख कारण काय टाकू सांगून
आजूबाजूला कुजबुज होतीया बघत्यात काय बोलतंय चोरून.....!
मला तुला नाहीं वाटत जावं सोडून
तुझ्या मनात कसला बी विचार नको देऊ आणून
मला तूझी काळजी वाटतिया
तुला कसं सांगूं समजावून मी नाय बद्ललो
अजून तुझ्यात गैरसमज आला कुठून
कशी भेट आणावी घडवून
तुझ्यात जीव पडला अडकून
तु नाहीं भेटली की मी जातो हैराण होऊन
तुझ्या प्रेमाखातर राहतो गुंतून
तु नको रडू सारखी आठवण काडून
माझ्या डोळ्यांच्या पापण्या नाहीं देत मिटून
तू कधी येशील माझ्या मिठीत धावून
तुझ्या ओठी माझं नावं असू दे
हेच गेलं तुला माझ्या मनातलं सांगायचं राहून.....!