STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

4  

Sakharam Aachrekar

Tragedy

सांग परतून केव्हा येशील...

सांग परतून केव्हा येशील...

1 min
24.1K

अपुर्‍या या नात्यास आपल्या, कवेत केव्हा घेशील 

पुन्हा माझ्या जीवनी सांग परतून केव्हा येशील


आवेगाचा पाऊस बरसतो, नेत्रांतून मम गालावरती 

हरवतेस जेव्हा लोचनांतून, आकस्मिक तू क्षितिजावरती

वेडावून तुज शोधत फिरतो,तुझी छबी घेऊन हृदयावरती 

उदास होऊन घरी परततो,तुझ्याविना मी सांजेसरती 

सांजेस त्या उदास मला सहवास तुझा देशील 

पुन्हा माझ्या जीवनी सांग परतून केव्हा येशील


आठवणींत आता तुझ्या रोजच्या, अश्रू माझे आटले 

सांग प्रिये काय दोष माझा, तू हृदय माझे लुटले 

गुंफलेले हात आपले केव्हा अचानक सुटले

धागे आपल्या अंतरीचे, कसे अनामिक तुटले 

सांग आता बाहुत माझ्या, मिटून केव्हा जाशील 

पुन्हा माझ्या जीवनी सांग परतून केव्हा येशील


तुझ्याविना या शहरात रोज उदास मी फिरतो 

भावनेत तुझ्या भेटीच्या, त्या सागरतीरी बसतो 

तुझ्या मृगजळी क्षण काही, उगाच मी फसतो 

तुझ्याविना बहर फुलांचा, मजवर निष्ठुर होऊन रुसतो

नात्यास या जुन्या आपल्या आकार नवा देशील 

पुन्हा माझ्या जीवनी सांग परतून केव्हा येशील


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy