सांग मरावे कसे
सांग मरावे कसे

1 min

11.9K
जगण्याची रित कळली आता सांग मरावे कसे
भगवंता सांग मेल्यानंतर मी विश्वात उरावे कसे
लेकरी उपाशी सारीच मग मी माझ्या पिल्लांना
चारावे कसे
चोरूनलुबाडुन लोकांना खिसे माझे तरी मी
भरावे कसे
मी हि एक अपराधीच कुणाला तरी उराशी
धरावे कसे
अर्धेमेले दुनियेतले सारेच हे यांना आता
मी मारावे कसे
पाहता इकडे तिकडे दु:ख मी मग आज
हसावे कसे
नाहि कुणी आपला इथे कुणासाठी मी
रूसावे कसे
दिसते हार माझी समोर मग यु़ध्दात मी
कुणाला दिसावे कसे
वार होताहेत माझ्यावर मी तटस्थ आज
बसावे कसे