सांग कोरोना
सांग कोरोना

1 min

266
सांग सांग कोरोना
आम्हा गरीबाचा गुन्हा
गरीब असणे होतो का रे
फार मोठा गुुन्हा
वाटले होते गाव सोडून
चार पैैसे कमवू
पोटाची खळगी भरत
पोराले थोडे शिकवू
मिळेल ते काम करून
आनंदाने जगत होतो
पोराले शाळेत पाठवून
मोठे स्वप्न पाहत होतो
आमचा आनंद बघवला नाही
आमच्या डोळयात पाणी आणलस
मानवी जीवनावर संकट आणून
स्वप्नावर पाणी फेरलास
आता येेथून निघून जा
पसरू नको हातपाय
नाहीतर उपाशी मरतील
माझी मुले बाप-माय ...