साजणी निघाली बनी
साजणी निघाली बनी
1 min
173
प्रभातीच्या रम्य कालात
सुंदरी निघाली झोकात
नारळी पोफळी बनात
नाजूक पाऊले तृणात
परडी फुलांची हातात
फुले रंगीत तयात
देवाला करते अर्पित
पवित्र भावना मनात
कुंतल लांब मऊशार
साडी जरतारी किनार
काठ शोभे हिरवागार
खुले रमणी तनूवर
अधोवदना अर्धस्मित
खुलते कपोल खळीत
काटा अवचित पायात
शोधिसी तू लगबगीत
आरसपानी सौंदर्याची
अप्सरा हरित बनाची
रक्तिमा लाली लज्जेची
मन केलेस घायाळची
असीम सौंदर्य लाभले
भावपूर्ण वदनी साजले
शब्द आज थिटे जाहले
साजणी तू मन जिंकले
