STORYMIRROR

Vikramsingh Chouhan

Others Abstract

2  

Vikramsingh Chouhan

Others Abstract

।।साई नंदन।।

।।साई नंदन।।

1 min
13.8K


अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक

राजाधिराज योगीराज ब्रम्ह

सच्चिदानंद तू साईनंद

सदा आनंद तू साईनंद ।।धृ।।

साईंची भक्ती , भक्तीत शक्ती

साईंची प्रीती ,प्रीतीत मुक्ती

मुक्तीचा मार्ग जगाला दावू

श्रद्धा सबुरीनं जगायला लावू।।१।।

मुक्ती मनाची,तनाला शक्ती

युक्ती साईंची, मनाला शांती

शांतीचा मार्ग जगाला दावू

श्रद्धा सबुरीनं जगायला लावू।।२।।

भीती मारण्याची,सक्ती जगण्याची

कृती साईंची,अमर होण्याची

कीर्तीचा मार्ग जगाला दावू

श्रद्धा सबुरीनं जगायला लावू ।।३।।

।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन