साहित्य चोरीचं
साहित्य चोरीचं
1 min
242
दुसऱ्याने लिहिलेलं साहित्य
चोरून काय बरं मिळवायचं
आपल्यां कल्पना शक्तीला
धुळीत का टाकायचं.....!
दिवस रात्र आम्ही लेखकानं
जागून काहींना कांही लिहायचं
नवीन संदेश देत रहायचं......।
नव्या पिढीला कांही तरी नवीन
करायला चालना द्यायला बघायचं
चोरीच्या किडमध्ये बसवायचं.....।
अरे अजून किती दिवस असं
चालतं रहायचं चोरी करून
आपल्या कलेवर फसवणूक करायचं....।
भावनांचं वादळ मनातं साचवायचं
आता साहित्य चोरीचा हा कलंक
एकत्रित मिळून पुसून टाकायचं...