साहेबाचा बंगला
साहेबाचा बंगला
1 min
25K
साहेबाचा बंगला, इटलीचं मार्बल
पॅरीसचं झुंबर, लकाकते.
साहेबाचं घड्याळ, मेड इन जापान
ओपेल आस्टीन, इंपोर्टेड.
साहेबाला पसंत, हॉलीवूड स्टार
देशी कलाकार, मूर्ख सारे.
साहेबाचा डॉगी, जर्मन शेफर्ड
देशी कुत्तरडं, हाडहाड.
साहेबाचा वॉचमन, नेपाळी गुरखा
चायनीज कूक, खानसामा.
साहेबाला प्यारे, फॉरेनचं सारं
देशी माणसं चोर, हरामखोर.
कर्ज बुडविण्या, बँक सहकारी
काळा पैसा भरी, स्वीस बँकेत
साहेबाचा मात्र स्वदेशीचा नारा
खादीच वापरा माझ्यासारखी.
