सागरी किनारा
सागरी किनारा
1 min
28.7K
तू मावळतीच्या सूर्यासवे खेळत बसली लपंडाव
सागराच्या या तुफानी लाटा घालती
काळजावरी घाव.
तू अल्लड हरणी गेली स्वत: चही अस्तित्व विसरून
मी वेडा दर्याकिनारी तुजसाठी बसलो बाहू पसरून.
तू धावते वाळूवरूनी कोमल पायांची पेरून नक्षी
सागराने मोडू नये ती मी छातीशी कवटाळूनी रक्षी.
शंख शिंपले मांडून वाळूवरती का तू बांधतेस घरटे
बघ राणी तुझ्याचसाठी मी केले माझे काळीज रिते.
मावळतीला सूर्य निरोप देई पूर्वेला चंद्र खुणवी
तू फक्त व्हावी माझी मी अर्घ्य देऊन दोघांना त्या विनवी.
