Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vikramsingh Chouhan

Others Abstract

2  

Vikramsingh Chouhan

Others Abstract

साधना

साधना

1 min
6.9K


साई चरणी करू वंदना , श्रद्धा सबुरी ची साधना

विकारी कामना , सोडुनी वासना 

खऱ्या भक्ती ची उपासना ।। धृ।।

काय सांगू मनाचा हा खेळ

खऱ्या खोट्याचा नाही रे मेळ

खोटी ती कामना , वेडी ती भावना

वेड्या मनाची मनोकामना

विसरुनी साऱ्या त्या वंचना ,करू साईंची ही प्रार्थना

विकारी कामना , सोडुनी वासना

खऱ्या भक्तीची उपासना ।।१।।

कसली स्वप्नं ही कसली अशा

उद्या साठी हो आजची दशा

मागेन ते मिळेना , मिळाले ते पुरेना

अर्ध पोटी कशी ही दैना

उगवतीचा दिवा पेटेना , अंधाराची सावट पुसेना

विकारी कामना , सोडुनी वासना

खऱ्या भक्तीची उपासना ।।२।।

भीती उद्याची विसरू चला

काळजाची काळजी सईला

धीर द्या ह्या मना , साई अंतर मना 

विश्वासाची ही आराधना

चला बाबांची करू प्रार्थना , भाव भक्तीची ही अर्चना

विकारी कामना , सॊडुनी वासना

खऱ्या भक्ती ची उपासना ।।३।।

।।सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ।।


Rate this content
Log in