Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

रविवार

रविवार

1 min
161


खरे पाहता रविवार उगवतो

मोठ्या आळसाचा

अंथरुणात पडून

मस्त मजेत पडून राहण्याचा...


सुट्टीमुळे 

थोडा विरंगुळ्याचा

अगदीच वाटले तर

मग थोड्याच धडपडीचा...


उरलीसुरली कामे

उकरून काढण्याचा

नाहीतर मग नुसत्या उठाठेवीची 

गोळा बेरीज करण्याचा...


आज मात्र हा बावडा उगवला

चांभारचौकशा करण्याचा

तेचतेच पुराण

पुन्हा वाटते अनुभवण्याचा...


म्हणून मुद्दाम म्हंटले आज 

शुभेच्छांची गरज खरोखरच आहे

अडल्या-नडल्यांना

सांभाळून घेणे आद्यकर्तव्यच आहे...


चला उठा मग 

आळस झटकून टाकू या

गरमगरम चहा घेतच

चांगले काहीतरी आज सत्कर्म करू या...


ढगाळलेल्या रविवारी

टांगती तलवार नजरेआड करू या

कुटुंबासमवेत जरा आजचा दिवस

मस्त मजेत आनंदात घालवू या..!


Rate this content
Log in