ऋतु
ऋतु

1 min

11.9K
असह्य उकाडा घेऊन येतो उन्हाळा
घामाच्या धारांना घालता येत नाही आळा
आईस्क्रिम, पाणीपुरीवर मारतो आम्ही ताव
सुट्टीच्या दिवसात छान वाटते आपले गाव
होता ढग काळा काळा
इशारा मिळतो येणार पावसाळा
मोर नाचतो थुईथुई
भिजण्याची पावसात आम्हाला असते घाई
होते मग आगमन हिवाळ्याचे
खावेसे वाटतात लाडू मेथीचे
स्वेटर रजईची होते शोधाशोध
खोकला आल्यावर खातो चमचाभर मध
प्रत्येक ऋतूची आहे एक विशिष्ट शैली
सारेच घेऊन येतात आनंदाची थैली
अजब आहे सगळ्यांचा थाट
आशेने पाहतो आम्ही त्यांची वाट