STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

रंगगंधित फुले

रंगगंधित फुले

1 min
218

गंध कोवळ्या फुलांचा

भरे तनमनामधी

चित्तवृत्ती प्रफुल्लित

मन प्रसन्न रंगांमधी


रम्य पहाटेची वेळ

दवबिंदू शिंपलेले

झाडावरी अलगद

फूल छान डोललेले


तेज सहस्त्ररश्मीचे

खुलवाया मोदभरे

हसतसे मनोमनी

डुलतसे लाजभरे


देई फुलपाखरासी

प्राशनास मकरंद

नच वेळाचेही भान

नादातच होई धुंद


करी बंदी भ्रमरासी

खुळा अडके खुशीने

गुज तयांचे प्रेमाचे

जाग रविकिरणाने


एक दिसाचे आयुष्य

सुकतसे झाडावरी

राही हसतखेळत

जगे नानाविधापरी


Rate this content
Log in