रंग
रंग
यौवनाने लाविली
गाली लाली लाल लाल
भांगात गं तुझ्या
आठवणींचा गुलाल
थराररला देह गोरा गोरा
हात सुंदर हाती
प्रेमाचे रंग सारे
गीत तुझे गाती
रंग सप्तरंग खुले
तुझ्या तना मनावर
आता मी हे रंग कसे
टाकू तुझ्या गं अंगावर
जरी तू लाजली हासली सखे
खेळणार मी सारेच रंग
प्रेमरंगी मन रंगले
रंगी रंगले गोरे गोरे अंग
होती हाती पिचकारी
रंगाने भरलेली
लाल हिरव्या निळ्या
रंगांनी काया ही रंगलेली