STORYMIRROR

Sunita Ghule

Others

1.5  

Sunita Ghule

Others

रम्य सकाळ

रम्य सकाळ

1 min
5.2K



पूर्व दिशा उजळली

लाली आभाळी दाटली

किलबिल पाखरांची

रम्य सकाळी उठली।


रवी किरणाची प्रभा

दाही दिशांना फाकली

तरूवेली आनंदात

स्पर्श होता तरारली।


दवबिंदू गवतात

मोत्यावाणी चमकले

गवतात रानफूल

अलंकार गळा ल्याले।


किणकिण घुंगरांची

गाई गोठ्यात पान्हल्या

वासरांच्या ओढीपोटी

धार अमृत सांडल्या।


रम्य सकाळ प्रहर

मंदिरात घंटानाद

दिव्य भक्ती वलयात

चित्ती पांडुरंग साद।


Rate this content
Log in