रक्षाबंधन
रक्षाबंधन

1 min

96
नाते भावा-बहिणीचे
अतूट असे रेशमी बंध
राखीच्या धाग्यांनी घट्ट
नसतो स्वार्थाचा गंध
जपुनि पावित्र्याचे नाते
रक्षाबंधनाचे असेच सूत्र
प्राण जीवाचे वाचायाला
शत्रूलाही करूयाच मित्र
बहिणीची भावावरी अशी
आईवाणीच असते माया
ताई असते प्रेम जिव्हाळा
भावा देते सदा छत्रछाया
माहेरचा असा सांगावाही
भाऊ येतोय तिला मुराळी
डोळ्यातून धारा वाहताना
बंधु घेतोच प्रेमाने जवळी
ममता नि जिव्हाळ्याची
असेच हृदयात साठवण
रक्षाबंधनाच्याच सणाला
येईच माहेराची आठवण