रिमझिम
रिमझिम
1 min
11.9K
ढगांनी भरले नभ
सुटला जोराचा वारा
रिमझिम रिमझिम
पडती पाऊसाधारा
दिवसभर पडतो
येते भिजायला मजा
घरी चला भरभर
सर्दी होते मग सजा
मातीचा वास पसरे
आडोश्याला पक्षी आले
काढल्या छत्र्या रंगीत
रेनकोटही शोधले
हिरवळीचा गालिचा
लोळला जमीनीवर
कपडे पण सुकेना
भोवताली चराचर
वडापाव व मिरची
भज्यांचा खमंग वास
जोडीला मंद संगीत
सगळेच कसे खास