STORYMIRROR

Manisha Awekar

Others

4  

Manisha Awekar

Others

रहा बिनधास्त!!

रहा बिनधास्त!!

1 min
1.2K

बिनधास्त असा सारे

रहायचं आनंदात

करायची नाही चिंता

करा मजा आयुष्यात   (१)


नका आणू मनामधे

वय चाललं वाढत

वय प्रेमाला कलेला

कधी नाही अडवत    (२) 


छंद बालपणातले

पुन्हा जपूया नव्याने

लाभ घेऊया कलेचा

सारेजण आनंदाने    (३)


आता कुठेशी उसंत

वर्धापनदिनासाठी

देऊ शुभेच्छा सदिच्छा

दीर्घ आयुःआरोग्यासी  (४)


पैलतीर दिसे आता

लांबवर धूसरसा

करा स्वागत तयाचे

मनी ठेवूनी आरसा    (५)


आली ही कांचनसंध्या

आज समीप आपुल्या

रमा प्रभू चिंतनात

वेळ थोडाच राहिला   (६)


Rate this content
Log in