रगंपंचमी
रगंपंचमी
1 min
406
आम्हा न कळे
रंग लागला कोणता
रंगात रंगलो आम्ही
जाणता अजाणता
पंचमी साधून धरिला
इंद्रधनूने ताल
बरसला रंग अगांवर
झाले लाल गाल
थंडाईची मजा आगळी
चढे रंगपंचमीला जोर
रंगांची करून उधळण
नाचती लहान थोर
ना ओळखे चेहरा माझा मला
ना तुझी ओळख पटे मला
रंगात रंगलेले सारे आज
नव्याने भेटले पुन्हा मला
