STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

रेषा...!

रेषा...!

1 min
27.5K


अख्खा जन्म गेला

रेषा मारण्यात

रेषा काढण्यात

रेषा ओढण्यात

रेषा पाहण्यात

रेषा गिरवण्यात

रेषा आखण्यात

रेषा ओलांडण्यात


रेषा पाळण्यात

रेषा जाणण्यात

रेषा जोखण्यात

रेषा तपासण्यात

रेषा मोजण्यात

रेषा बांधण्यात

रेषा गुंफण्यात

रेषा विणण्यात

रेषा सोडवण्यात


रेषेत चालण्यात

रेषेत पळण्यात

रेषेत उड्या मारण्यात

रेषेत पाहण्यात

रेषेत निशाणा साधण्यात

रेषेचा वेध घेण्यात

रेषेचा नेम धरण्यात

रेषेचा मागोवा घेण्यात

रेषेने सार जीवन व्यापलं


रेषेने नात जोडलं

रेषेने नात तोडलं

रेषेने सर्व काही केलं

पण रेषेने इमान राखलं

माझ्या डोळ्याचं पारणं फेडलं

माझ्या जीवनाचं सार्थक केलं

माझ्या माणसांना रेषेत आणलं

माझ्या माणसांना सरळ केलं

माझ्या सर्व रेषांना मोल दिलं

माझ्या प्रत्येक रेषेला अनमोल ठरवलं

माझी रेषा मी म्हणेल ती पूर्ण ठरवते

माझी रेषा जीवनाचा अर्थ सांगते

माझी रेषा माझे जीवन रेखते

माझी रेषा माझे जीवन उन्नत बनवते...!!!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్