रे जीवना..
रे जीवना..
1 min
27
जरा हळू चाल रे जीवना,अजून
कित्येक कर्जांची करायचीय परतफेड.
काही वेदनांना सल आहे अजून,
कितीशा जोखीमांची लावायची आहे कड.
तुझ्या वेगाने चालण्याने
काही रुसले,काही तुटले.
रुसलेल्यांना मनवायचे अन्
रडणाऱ्यांना हसवायचे बाकी उरले.
काही नाती बनली, काही तुटली
काही जुळता जुळता सुटून गेली.
त्या तुटलेल्या-सुटलेल्या नात्यांच्या
जखमांवर फुंकर घालायची आहे उरली.
काहीशी इच्छा अजूनही अपुरी,
काही कामे आहेत अजून जरुरी.
जीवना तुझ्या काही कोड्यांची
सोडवायची आहेत उत्तरे अधुरी.