रातवा
रातवा


(अष्टाक्षरी काव्य रचना)
सांज झाली रे रातवा,
संध्या च्या प्रहरी दिवे
विझे,वाड्यामध्ये सुन्न
झाले,वड्या वस्त्या दिवा.।।।१।।।
रात किर्रर्र किर्रर्र,
शांत झाडाचा तो मंद
वारा, झुळूक सरली,
समुद्राच्या काठी गंध.।।।२।।।
समुद्राची लाटा,उंच
उंच जाई,सोसाट्याचा
वारा, काठावर येई
शंख शिंपले च्या साचा.।।।३।।।
समुद्राच्या काठावर,
रातवाच्या देठावर,
भीती कसली आहेत,
रात्र काढू बोटीवर. ।।।४।।।
पकडूया मासे,आणि
रातवाच्या संगे, झोळी
भरू चिंबोरीची,पाठी
भरलेली मासे मांदेली.।।।५।।।
रास लीला खेळू, मंद
प्रकाशात, शांततेत
गाऊ, संगीताचे गाणे,
किर्र किर्र समुद्रात. ।।।६।।।
रातवाच्या संगे, वारा
वाही अभंगे सागर
खवळले, दुर्घटना
होई रे, समुद्रावर. ।।।७।।।